पोलीस विभागतर्फे ४२ अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत : अशोक बनकर यांचा उपक्रम
४२ अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड,खाकीमधून घडले माणुसकीचे दर्शन
देवरी १९: माणुसकी आणि सामाजिक भावनेतून देवरी पोलीस विभागाने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या संकल्पनेतून एक काम वतन के नाम या कार्यक्रमातून देवरी येथे ४२ अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देत खाकीमधील माणुसकीचे दर्शन घडविले.
ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने देवरी शहरात अनेक घरे पडली होती. मूलभूत गरजांपैकी एक अतिवृष्टीग्रस्तांच्या समस्यांचे आली. निवारा उद्ध्वस्त झाल्याने या कुटुंबांवर फार मोठे संकट कोसळले होते.
निराकरण करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी एक काम वतन के नाम ही संकल्पना पोलीस विभागासमोर व देवरी येथील दानदात्यांसमोर ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला साथ देत पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, आदिवासी विकास विभाग, नगरपंचायत, सार्वजनिक मंडळ, व्यापारी वर्गाने मदत केली. या सर्वांच्या मदतीतून देवरी येथील आदिवासी भवन येथे एक काम वतन के नाम या मदतीच्या कार्यक्रमातून ४२ अतिवृष्टीग्रस्त परिवारास प्रत्येकी १३ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुड़े उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष भास्कर यांनी केले तर आभार अजय पाटील यांनी मानले. प्रास्तविक विठ्ठल करमळकर यांनी मानले.