“एक दिवाळी चिमुकल्यांच्या आनंदासाठी” अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांचे स्तुत्य उपक्रम
देवरी १८: समाज सेवा हीच खरी सेवा लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्हा पोलीस व कॅप लिमिटेड पुणे तसेच डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अति दुर्गम ग्राम पळसगाव येथे गरजू शाळकरी 50 लहान मुला मुलींना टिफिन बॉक्स व पाणी बॉटल वितरित करण्यात आले याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर साहेब तसेच क्वेस कॉर्प लिमिटेड श्री रवींद्र वाकचौरे सीनियर रिक्रुटर मॅनेजर पुणे व डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा.लि नागपूर श्री मनोज रहांगडाले सीनियर सोशिंग एक्सझुकेटीव्ह आणि ऑपरेशन मॅनेजर नागपूर आणि एपीआय करमळकर पीएसआय सैदाने, दुधमल
इंगोले देवरी कार्यालयाचे श्रीमती रेखा धुर्वे श्री रमेश मोहुर्ले श्री चंद्रशेखर गणवीर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा ह्या सामाजिक कार्याचे पळसगाव येथील गावकरी लोकांनी गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले आहे व असे मदतीचे काम सदैव करत रहा करीता शुभेच्छा दिल्या.