धुकेश्वरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवरी 24- येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण शारदीय नवरात्र निमीत्त २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तथा विविध झाकी, ईलेक्ट्रीक झुले, लक्की ड्रा, आणि मिना बाजाराचे आयोजन केले आहे.
यात २६ सप्टेंबरला सायंकाळी ०६ : ०० वाजता घटस्थापना, २७ सप्टेंबरला रात्री ०७ : ३० वाजता रास गरबा शो, २८ व २९ सप्टेंबरला रात्री ०७ : ३० वाजता भव्य नृत्य स्पर्धा, ३० सप्टेंबरला पंचमी अभिषेक व रात्री ०७ : ३० वाजता छत्तीसगढ जस झाकी, ०१ ऑक्टोबरला रात्री ०७ : ३० वाजता भजन स्पर्धा, ०२ ऑक्टोबरला रात्री ०७ : ३० वाजता दांडीया स्पर्धा, ०३ ऑक्टोबरला हवन व सायंकाळी ह.भ.प. प्रशांत ठाकरे यांचे जाहीर किर्तन आणि ०४ ऑक्टोबरला रात्री ०७ : ३० वाजता ज्योत विसर्जन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
या शारदीय नवरात्र निमीत्त पुन्हा भक्तांच्या मनोकामनासाठी ज्योत राखीव सुरु आहे. यात नऊ दिवसाच्या तेल ज्योतीसाठी ८०१/- रुपये असून आजीवन ज्योतीसाठी २१०००/- रुपये तर, तूप ज्योतीसाठी नऊ दिवसाचे ११०१/- रुपये असून आजीवन ज्योतीसाठी ३१०००/- रुपये देणगी आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share