‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त गणेश मंडळात रांगोळी स्पर्धा संपन्न, बघा रांगोळ्या…

◼️’देवरीचा राजा ‘ नवयुवक किसान गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

देवरी 03: नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी च्या वतीने गणेश उत्सवानिमित्त आजादी का अमृत महोत्सव विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश भेलावे , मंडळाचे उपाध्यक्ष बापू निर्वाण सचिव संजय बळगये बंडू कापसे बाला निर्वाण , चंदू कुंडलीकर ,निखिल शर्मा ,अजित बघेले इ उपस्थित होते.

सदर स्पर्धेत विविध प्रकारच्या रांगोळी साकारण्यात आल्या असून त्यांचे परीक्षण ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या शिक्षिका गुंजन जैन यांनी केला. स्पर्धेत विजयी स्पर्धकांचे नाव बक्षीस वितरणाच्या दिवशी घोषित करण्यात येणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share