देवरी येथे आज लोकशाही दिन

प्रहार टाईम्स ■ तालुक्यातील जनतेसाठी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन अनमोल सागर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय देवरी येथील सभागृहात करण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्ताने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी

देवरी यांच्याकडून जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकून घेण्यात येतील आणि शासनाच्या विविध विभागांचे उपविभागीय स्तरावरील प्रमुख अधिकारी यांना त्यासंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश देतील. उपविभागीय अधिकारी देवरी कार्यालयात लोकशाही दिनानिमीत्त या कार्यक्रमात ज्या नागरिकांनी १५ दिवसापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत.

त्यांनीच लोकशाही दिनात उपस्थित राहून आपल्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी सादर करावीत. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे, मास्कचा वापर करणे व सामाजिक विलगता राखणे आवश्यक आहे. याबाबत जनतेनी नोंद घ्यावी असे आवाहन अनमोल सागर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी यांनी केले आहे.

Share