प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथे जन आरोग्य समिती गठीत

◼️ महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

प्रहार टाईम्स
देवरी 14: जिल्हा परिषद क्षेत्र गोटाबोडी येथे 1998 पासून निर्माण असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्राची जन आरोग्य समिती निर्माण करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला च्या सभागृहामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सविता पुराम महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया , कल्पना वालोदे जिल्हा परिषद क्षेत्र गोटाबोडी, अनिल बिसेन उपसभापती पंचायत समिती देवरी, वैशाली पंधरे पंचायत समिती सदस्य क्षेत्र ओवारा, ममता अंबादे पंचायत समिती शेत्र पुराडा, नितेशकुमार वालोदे युवा महामंत्री भारतीय जनता पार्टी देवरी, सुनील येरने वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला, प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती मधील सर्व सरपंच विनोदकुमार भांडारकर , मनोहर राऊत सरपंच गोटाबोडी, मरसकोल्हे सरपंच सुरतोली, भैरम सरपंच ग्रामपंचायत पिंडकेपार , नाईक उपसरपंच मुल्ला, सदर सभेला उपस्थित होते
सदर आढावा बैठकीमध्ये सविता पुराम महिला व बालकल्याण समिती सभापती जिल्हा परिषद गोंदिया यांची जनआरोग्य समिती मुल्ला च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली व इतर पदाधिकाऱ्यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. सदर सभेला संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला च्या अंतर्गत येणारे उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सी एच ओ व इतर कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना जनसामान्यापर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याचे व जनसामान्यांना अत्यंत प्रामाणिकपणे व प्रेमाने त वागणूक देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे व अशा अनेक समस्याला घेऊन मार्गदर्शन केले व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांना भेडसावणाऱ्या समस्याच्या बाबतीत सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले व प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला व इतर उपकेंद्र अंतर्गत भौतिक सुविधेच्या बाबतीत सुधारणा करण्याच्या बाबतीत आश्वासन दिले.

Share