अंगणवाडी कर्मचार्‍यांची जिल्हा परिषदेवर धडक

महाराष्ट्र राज्य आंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आयटक जिल्हा शाखेच्यावतीने सोमवार 4 जुलै रोजी विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यासोबतच 21 हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे. वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी. सेवानिवृत्त सेविका व सहाय्यिकांना एक रकमी थकीत रक्कम देण्यात यावी. पोषण आहार अ‍ॅप मराठी भाषेत करुन नवे मोबाईल देण्यात यावे आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याचे नेतृत्व आयटकचे प्रदेश उपाध्यक्ष हौसलाल रहागंडाले, अंगणवाडी सेविका संघटन जिल्हाध्यक्ष शंकुतला फटिंग, आम‘कला डोंगरे, जिवनकला वैद्य, पौर्णिमा चुटे, विठाबाई पवार, बिरजूला तिडके, कांचन लाडे यांनी केले. मोर्चा जिल्हापरिषदेसमोर पोचल्यानंतर महिला व Anganwadi staff बालविकास विभागाचे उपमु‘य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांना मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे वरील मागण्यांचेे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सुनिता मंलगाम, मिनाक्षी पटले, राजलक्ष्मी हरिणखेडे, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, देवगंणा अंबुले, अर्चना मेश्राम, प्रणिता रंगारी उपस्थित होते.

Share