कृषी संजीवनी प्रदर्शनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी संजीवनी ठरेल : सभापती अंबिका बंजार

प्रहार टाईम्स @ डॉ. सुजित टेटे

देवरी 28: तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवरीच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे तालुक्यातील अंभोरा गावात करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षा अंबिकाताई बंजार सभापती पंचायत समिती देवरी यांनी भूषविले होते. याप्रसंगी जी.जी तोडसाम तालुका कृषि अधिकारी देवरी, जी.एस. पांडे मंडल कृषि अधिकारी चिचगड, एफ. एम. कापगते कृषि पर्यवेक्षक चिचगड , कु. डी. एम गौतम, कृषि सहाय्यक आंभोरा , कु. एल. एस. धानगाये, एच जी वाढई, एस. ए. हुड़े, जी.पी.कोरे, मनोजकुमार बडोले पो.पा. आंभोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

देवरी सारख्या आदिवासी , मागासलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी संजीवनी प्रदर्शनीचे महत्व मोलाचे असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणातून आधुनिक शेतीकडे आपले धैर्य केंद्रित करावे आणि देवरी सारख्या मागासलेल्या भागात उत्तम शेतीकरून उत्पादनच टक्का वाढवावा असे मत अंबिका बंजार यांनी व्यक्त केले.

सदर कृषी प्रदर्शनीमध्ये बीजप्रक्रिया ,हिरवडीचे खत, निंबोळी अर्क, दशपणी अर्क ,भात लागवड – चारसुत्री, श्री, पट्टा पद्धत , पौष्टिक आहार आदी विषयावर मार्गदर्शन प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील गावकरी , शेतकरी या प्रदर्शनीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविलेली होती.

Share