समर्थ विद्यालय लाखनी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

राष्ट्रीय शिक्षण संस्था, द्वारा संचालित समर्थ विद्यालय लाखनी तथा नेहरू युवा केंद्र भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक समर्थ विद्यालय लाखनी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पतंजली योग समितीच्या सौ.कविता मोळकीरे, हेतलाल पटले यांनी योगाभ्यासाचे धडे विद्यार्थी तसेच शिक्षकांना गिरवले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय भदाडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाला प्रदिप बुरडे, सौ.विजया घनमारे, गोवर्धन गिऱ्हेपुंजे व इतर शिक्षक तसेच एन सी सी छात्रसैनिक आणि नेहरू युवा केंद्राचे तालुका प्रतिनिधी सौरभ बोरकर, रोहीत फसाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप लिचडे तर आभार अक्षय मासुरकर यांनी मानले.

Share