राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, लाखनी येथीलएस. एस. सी.परीक्षा मार्च – एप्रिल 2022 चा निकाल 100%

प्रावीण्य श्रेणीत 67 विद्यार्थिनी
प्रथम श्रेणीत 41 विद्यार्थिनी
द्वितीय श्रेणीत 07 विद्यार्थिनी

यात कुमारी पूर्वा नरेश नवखरे 91.80%, कुमारी लीनल डीलेश्वर पटले 91.40%, कुमारी यशश्री दामोदर सिंगनजुडे 91.20% अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आहेत. गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, सहकार्यवाह डेबूजी धांडे, संस्था संचालक शिवलालजी रहांगडाले, मधुकरराव लाड यांनी अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका डॉ. सौ.मीरा विजय बारई ,सौ सुनिता राजेंद्र खंडाईत ,कु. राजश्री चव्हाण, श्री भोलानाथ निनावे यांनी गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थिनींच्या घरी जाऊन विद्यार्थिनी व पालकांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांना तसेच आपल्या आई वडील यांना दिले.

Print Friendly, PDF & Email
Share