श्रीमती के.एस.जैन विद्यालय देवरीचा निकाल ९२ टक्के

एकांशू नंदूप्रसाद शर्मा ९१.६० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम

देवरी, ता.१८: देवरी येथील श्रीमती के.एस.जैन विद्यालयातून १०वी २०२२ च्या परीक्षेत एकूण ५९ विद्यार्थी बसले होते. यापैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत या परीक्षेत विद्यालयाचा संपूर्ण निकाल हा ९२ टक्के लागला.
या परीक्षेत देवरीचा एकांशू नंदूप्रसाद शर्मा यांनी ९१.६० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. यांनी सर्व विषयात प्राविण्य मिळविला असून याला इंग्रेजी विषयात ९४ टक्के गुण मिळाले आहेत तर हिमांशी दिनेश्वर शहारे हिने ८८.६० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक आणि वैष्णवी महेश मडावी हिने ८६.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच या विद्यालयातील ११ विद्यार्थी प्राविण्य यादीत तर २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि १९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व ३ विद्यार्थी उत्तीर्ण अशा प्रकारे एकूण ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
ह्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे विद्यालयाच्या वतीने प्राचार्य रजिया बेग, सहाय्यक शिक्षक प्रकाश परिहार, वर्गशिक्षक निरंजन पटले, उर्मिला परिहार,सुरेखा बडोले,प्रा. अनील कुर्वे, सरोज गैहरवार आदींनी पुष्पगुच्छ देवून मिठाई चारून अभिनंदन आणी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share