भ्रष्टाचाराचा अड्डा ठरला ‘देवरी आरटीओ चेकपोस्ट’ : बंटी शेळके

▪️शिरपूर येथे अवैद्य वसुलीच्या विरोधात बंटी शेळके यांचे 7 दिवशीय आंदोलन सुरु

देवरी 28 : आरटीओ चेक पोस्ट अवैद्य वसुलीचा गड असल्याचे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चेक पोस्ट वर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या एजेंट द्वारे ट्रक वाहन चालकांकडून अवैद्य स्वरूपात वसुली करून त्यांच्या आर्थिक शोषण केला जात असल्याच्या अनेक बातम्या माध्यमांनी प्रश्नासमोर आणल्या परंतु त्यावर कुठलाही तोडगा निघाला नसल्यामुळे नागपूर महानागपूर पालिकेचे माजी नगरसेवक तथा भारतीय राष्ट्रीय युवक कांग्रेस चे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी आपल्या समर्थकांसह देवरी चेक पोस्ट वर 7 दिवशीय आंदोलन पुकारले आहे. आरटीओ मध्ये कार्यरत असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून हजारो ट्रक चालक मालकांच्या आर्थिक शोषण थांबवावा, आरटीओ दलाल मुक्त करणे , गुंडागर्दी करून अवैद्य वसुली थांबवावी , आरटीओच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे , कोट्यवधीचा राजस्व महसूल चोरी थांबवावी आणि शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सदर आंदोलन साखळी पद्धतीने दोषींवर कारवाई होत पर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगितले.

यामध्ये भंडारा जिल्हा युवक कांग्रेस उपाध्यक्ष सोनु बैरागी, भंडारा विस युवक कांग्रेस अध्यक्ष आकाश ठवकर, उपाध्यक्ष आनंद चिंचखेडे सह विदर्भ व छत्तीसगढ़ युवक कांग्रेस चे अनेक कार्यकर्तागण उपस्थित आहेत.

▪️ आरटीओ चेक पोस्ट वरील गुंडागर्दी थांबविण्यासाठी , राजस्व बुडविणाऱ्यावर कारवाईच्या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळाला नाही बंटी शेळके

भारतीय युवक कांग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी आरटीओ चेकपोस्ट वर खुलेआम गुंडागर्दी, अवैध वसूलीच्या विरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासन द्वारा असहकार्य आणि नकारात्मक भूमिका असल्याचे आरोप लावले आहे. देवरी येथील सिरपुर चेकपोस्ट वर शांतिपूर्ण आंदोलन सुरु करण्यासाठी परवानगी मागितली असता देवरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी देवरीचे तहसीलदार द्वारा परवानगी दिल्यानंतर सुद्धा परवानगी देण्यास नकार दिला असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

▪️संघठीत लूटमार करण्याचा अड्डा झाला महाराष्ट्र छत्तीसगढ़ आंतरराज्यिय चेकपोस्ट:

महाराष्ट्र छत्तीसगढ़ राज्याच्या सीमेवर स्थित देवरी शिरपूर चेकपोस्टमहाराष्ट्र शासनाचा परिवहन तपासणी नाका अवैध वसूली चा अड्डा झाला आहे.
दररोज हजारों मालवाहक वाहनांकडून लाखोंची अवैध वसूली मुळे आर्थिक आणि मानसिक तणाव सहन करावा लागत आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर दरवर्षी करोड़ों रुपयाचा चुना लागत आहे.
छत्तीसगढ़ कडून महाराष्ट्रत प्रवेश करणाऱ्या वाहनावर अवैध पणे 100 ते 500 रूपए इतकी इंट्री घेतली जात असून अधिकाऱ्यांसोबत मिलीभगत करून दलालांकडून ट्रांसपोर्ट, होटल मालक यांच्या नावाचे कार्ड बनवून दर महिन्याला प्रति कार्ड 2500 ते 3000 रुपये वसूली केली जात आहे. सुनियोजित आणि संघटित पद्धतीने हि लूट होत असून दलाल, काही धाबा/होटलचे संचालकी आणि परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांचे नेटवर्क बनलेले आहे.

▪️मैनेजर आहे मुख्य सूत्रधार :

दर महिन्याला लाखो रुपयाची अवैध वसूली करण्यासाठी येथे कर्तव्यावर असलेला आरटीओ आपल्यासोबत आपला एक वयक्तिक व्यक्ति ठेवतो त्याला मैनेजर असे कोड वर्ड दिले आहे.
इंट्री च्या नावे वाहन चालकाकडून केलेली वसूली हि यांच्या मधुमातून होते आणि सिरपुर चेकपोस्ट च्या दोन्ही दोनो आॅफिस समोर हे दिवसरात्र तैनात असतात. एंटी करप्शन च्या कारवाई पासून वाचण्यासाठी कायदेविषयक कारवाईतून वाचण्यासाठी मैनेजर तैनात केले जातात.

Print Friendly, PDF & Email
Share