महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा
गोंदिया: वाढती महागाई, उन्हाळी धान खरेदीची मर्यादा वाढविणे व अन्य मागण्यांना घेऊन आज शुक्रवार 27 मे रोजी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, किसान आघाडी योगेंद्र भगत यांच्या नेतृत्वात फुलचूल येथील म. ज्योतिबा फुले चौकातुन जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
केंद्रशासन महागाई रोकण्यात अपयशी ठरली आहे. जिवनावश्यक वस्तुंसह इंधन, स्वयंपाकाचा गॅस, खते, किटकनाशके यांची प्रचंड प्रमाणात भाववाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे जिने मुश्कील झाले आहे. त्यातच केंद्र सरकारने उन्हाळी धान खरेदीची मर्यादा कमी करून धान उत्पादकांवर अन्याय केला असून केंद्र शासनाने प्रति हेक्टरी 45 क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवुन द्यावी, जिवणावश्यक वस्तुंचे दरासह इंधन, स्वयंपाकाचा गॅस, खेते, किटकनाशके आदींचे दर कमी करावे, या मागण्यांचे निवेदन जिलहाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला पाठविण्यात आले. यावेळी देवेंद्रनाथ चौबे, यशवंत गणवीर, नरेश माहेश्वरी, पुजा सेठ, रविकांत बोपचे, निरज उपवंशी, राजलक्ष्मी तुरकर, राजू एन. जैन, अशोक सहारे, डॉ. अविनाश जायस्वाल, केतन तुरकर, सुरेष हर्शे, मनोज डोंगरे, बाळकृश्ण पटले, अखिलेश सेठ, नेहा तुरकर, अनिता तुरकर, ललिता पुंडे, जनी गौतम, सविता पटले, उषा मेश्राम, सुरेंद्र रहांगडाले, कृष्णकांत बिसेन, जगदीश बहेकार यांच्यासह राकॉचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.