झुडपी जंगल नोंद असल्याने नागरिक अनेक सुविधा पासून वंचित, नियमाकुल करण्यासाठी पाठवला प्रस्ताव: संजू ऊईके

◼️झुडपी जंगल नियमाकुल करण्यासाठी देवरी नगरपंचायत ने पाठवला प्रस्ताव

देवरी :- गोंदिया जिल्ह्यात देवरी नगर पंचायत अंतर्गत वार्ड नंबर 12,13,14,15,16,17 हे सर्व वार्ड झुडपी जंगलात मोडत असून त्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यास मोठ्या अडचणी येत होत्या याठिकाणी नागरिक गेल्या 40 ते 50 वर्षापासून रहिवाशी असून सुद्धा झुडपी जंगल कायद्याने अनेक सुविधा पासून वंचित आहेत.हीच अडचण लक्षात येताच नवनियुक्त नगर पंचायत अध्यक्ष संजू उईके यांची विशेष सभा घेऊन झुडपी जंगलाला नियमाकुल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय पाठवला.जिल्हाधिकारी कार्यालय ने सुद्धा या प्रस्तावाला मजुरी देऊन शासन दरबारी सादर केले असून लवकरच मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस नगर पंचायत अध्यक्ष संजू उईके यांनी केला आहे.

Share