देवरी : आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स यांच्या स्मरणार्थ जागतिक परिचारिका दिन साजरा
प्रा.डॉ . सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी 12: जगभरात 12 मे हा जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) साजरा केला जातो. फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ जागतिक परिचारिका हा दिन साजरा केला जातो. याच प्रित्यर्थ देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आनंद गजभिये यांनी रुग्णालयातील सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालय देवरी येथील सुनीता कोट्टेवार , पूजा हुकरे , प्रज्ञा सावंत, तुलसी बघेल, वैशाली नागपुरे , अलका श्रीपत्रे , विजीता उके , सरिता गावडकर , निशा आचले , ज्योती हत्तीमारे , पूनम कुंडभरें , आदी सर्व परिचारिका मुकेश पावरा, व्यंकटेश बिसेन उपस्थित होते.
फ्लोरेन्स यांच्या नायटिन्गेल यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केला जातो.
गडचिरोलीसह राज्यातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार