उन्हाळ्यात जास्तीत जास्त फळे खा, शीतपेय टाळा : डॉ. लक्ष्मीकांत चांदेवार

देवरी 09: उन्हाळ्यातील वातावरणातील तापमानामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात त्यामुळे ते आरोग्यास घटक ठरू शकते. तापमानामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जास्तीत जास्त उपलब्ध असलेले फळाचे सेवन करण्याचे आवाहन डॉ. लक्ष्मीकांत चांदेवार यांनी रुग्णांना मार्गदर्शन करतांना सल्ला दिला आहे.

टरबूज या ऋतूत सुपरफूडपेक्षा कमी नाही. टरबूजमध्ये 90 टक्के पाणी असते. यामध्ये पोटॅशियम, लायकोपीन असे विविध पोषक घटक असतात. ते हृदय निरोगी ठेवतात. टरबूजामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. टरबूजाचे रोज सेवन केल्याने हृदय निरोगी राहते. हेल्थलाइननुसार, टरबूजामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आढळतात. शरीराला गंभीर आजारांपासून वाचवण्यास हे फळ उपयोगी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. प्रतिकारशक्ती वाढते, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. यामुळे आपण संसर्ग आणि रोगापासून वाचू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त फळांचे सेवन करा असा सल्ला डॉ. लक्ष्मीकांत चांदेवार यांनी देवरी येथील लक्ष हॉस्पिटल मध्ये रुग्णांना दिला.

Share