गोंदिया जिल्हातील भाजप नेत्यांसह पौर्णिमा ढेंगे यांनी घेतली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट

गोंदिया 08: दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मुहुर्त ठरला असून 10 मे रोजी होणार्‍या जिप अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसले तरी भाजप सत्ता स्थापनेचा प्रमुख दावेदार आहे. 53 सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे 26 सदस्य आहेत. भाजपाला बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे.

यातच आज दिनांक 8 मे 2022 रोज रविवारला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांची आमदार विजयभाऊ रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनीलजी मेंढे, नवनिर्वाचित जिप सदस्य पौर्णिमा ढेंगे , नवनिर्वाचित जिप सदस्य सोनुभाऊ कुथे, उमाकांत ढेंगे उपस्थित होते.

सदर भेटीमुळे जिल्हातील राजकारणात चर्चेला उधाण आले असून जिप गोंदियावर भाजप ची सत्ता बसण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

Share