रेती माफियांसोबत पोलिसांची मटण पार्टी, Video झाला वायरल

भंडारा: उपविभागीय अधिकाऱ्यावर रेती माफियांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकातील कर्मचारी चक्क आरोपी आणि रेती तस्कर यांसोबत मटण पार्टी करीत असल्याच्या बाहेर आलेल्या खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली चौकशीअंती कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले. 27 एप्रिलच्या पहाटे अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्याच्या दृष्टीने गेलेले भंडार्‍याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्या सह त्यांच्या पथकावर 20 ते 25 रेती माफियांनी हल्ला चढविला होता. राठोड यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती.

या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पंधरा ते वीस यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथका पैकी एका पथकातील पोलिस कर्मचारी चक्क रेतीची अवैध व्यवसाय करणारे आणि मारहाण प्रकरणातील आरोपी सोबत मटण पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जवळील एका पार्टी झाल्याचे समजते. म्हणजे या पार्टीत सहभागी असलेले पवनी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलीप घावडे हे आपल्या विक्रमाच्या गप्पा मारताना दिसत आहे. येथे असताना अनेकांची नावे उडविली. किरकोळ गोष्ट आहे असे सांगून दोषींना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचे दिसते. यामुळे आता पोलीस खाते खडबडून जागे झाले असून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मारहाणीचे प्रकरण वेगळ्याच दिशेने जात असल्याचे दिसू लागले आहे. दरम्यान अशा पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. तर या व्हिडीओची सत्यता तपासून चौकशीअंती कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

Share