अखेर जिप गोंदियाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला

प्रहार टाईम्स

गोंदिया 25: जिप गोंदियाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद कुणाच्या वर्णी लागणार याची सर्वांना आतुरतेने वाट होती. त्याचा मार्गमोकळा झाला असून जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी विशेष सभेची नोटीस काढली असून जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालय परिषदेची विशेष सभा दिनांक १० मे २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जोडपत्रात उल्लेखिलेल्या कामकाज चालविण्यासाठी भरविण्यात येणार आहे.

सदर सभेस सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यास आपणांस विनंती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद गोंदिया येथे दिनांक १० मे २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या सभेत चालविण्याचे कामकाज खालील प्रमाणे आहे

(1) अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया पदाची निवड करणे.

(अध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव. (शासन अधिसुचना ग्रामविकास विभाग क्र. जिपनि 2018/प्रक्र 215 /पंरा-2 दिनांक 4 डिसेंबर 2019 नुसार)

(2) उपाध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया पदाची निवड करणे. (उपाध्यक्ष पद आरक्षित नाही)

Share