शासकीय आश्रमशाळेत शाळा पूर्व तयारी व विविध आदिवासी योजनांचे मार्गदर्शन

◼️एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कर्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या विशेष उपस्थिती

देवरी 21: शासकीय माध्यमिक व उच्च माध्य. कन्या आश्रमशाळा बोरगाव येथे शाळा पूर्व तयारी अभियान व विविध आदिवासी योजनांचे मार्गदर्शन पर कार्यक्रम आदिवासी पालक व महिला बचत गटाचे भगीनी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 18.04.2022 रोज सोमवारला पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी समाजाला मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. गुणवत्ता असलेल्या विदयार्थीनींना NEET व MHCET परिक्षेकरिता प्रकल्प कार्यालय देवरीकडून उन्हाळी सुट्यामद्धे आश्रमशाळा बोरगाव येथे प्रशिक्षण देण्यात येईल तसेच 9 वि व 11 विच्या मुलींकरिता आश्रमशाळा बोरगाव येथे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले सदर शाळा ही गोंदिया जिल्ह्यातील एकमेव आदर्श आश्रमशाळा शासनाने घोषित केल्याने आधुनिक सोयी सुविधा या शाळेला प्राप्त होणार असल्याचे जाहीर करून आपल्या पाल्यांचा प्रवेश आजच निश्चित करण्याचे आवाहन केले व आश्रम शाळेतील सोयीसुविधा याची सविस्तर माहिती पालकांना दिली. इ. 1 ली मध्ये नवीन प्रवेशीत 15 विद्यार्थ्यांचे शालेय शैक्षणिक साहित्य, खाऊ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सहा प्रकल्प अधिकारी मा. श्री.सिरयाम साहेब यांनी सुध्दा योजनेबाबत व शाळेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नरेंद्र भाकरे यांनी केले. त्यामध्ये आमची शाळा रात्री 10 वाजता आम्ही बंद करतो त्यामुळे शाळेतील सर्व सोयी सुविधा मुलींना जास्तीत जास्त वेळ उपभोगता येतात व सर्व कर्मचारी शाळेच्या आवारात 24 तास राहत असल्याने मुलींना 24 तास मार्गदर्शन सुरू असते. सहकारी तत्वावर शाळेमध्येच सर्व वस्तु मुलींना उपलब्ध असल्याने आवारा बाहेर कुणीही भटकत नाही. 200mbps स्पीडचे बीएसएनएल वायफाय व पालकांना संपर्क करण्यास टेलीफोन मोफत मुलींना 24 तास उपलब्ध असतो. तसेच 100 टक्के मुलींच्या संरक्षणाची काळजी येथे घेण्यात येत असल्याने आपल्या मुलींचा प्रवेश आजच निश्चित करण्याचे आवाहन भाकरे यांनी केले. आलेल्या सर्व पालक, पाहुणे व महिला बचत गटाला शाळेतील सर्व सोयीसुविधा जसे संगीत वाद्य, ग्रंथालय, प्रयोगशाळा व्यवसाय अभ्यासक्रम ब्युटि वेलनेस व हेल्थ केअर प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा 86 इंची इंटरॅक्टिव पॅनल विज्ञान प्रदर्शनी रांगोळी व चित्रकला प्रदर्शनी इ. ठिकाणी भेटी देण्यास स्वत घेवून गेले. शाळेतील विविध विडियो व यू ट्यूब वर बचत गटाचे मार्गदर्शन पार विडियो इंटरॅक्टिव पॅनल वर दाखविण्यात आले. 1 ली री च्या मुली इंटरॅक्टिव पॅनल हाताळतांना प्रात्यक्षिक दाखविले. सदर कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम प्रकल्प अधिकारी मा. विकासजी राचेलवार, सहा प्रकल्प अधिकारी मा. श्री. सरयाम, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त मा. श्री. प्रल्हादाजी भोयर, सरपंच सौ. कल्पनाताई देशमुख , उपसरपंच सौ. काशीबाई कुंजाम शाळा व्य. समिति अध्यक्ष श्री. सुधीरजी जाळे व सदस्य कैलासजी देशमुख यांनी बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिप प्रज्वलीत करण्यात आले. गावळ सर व मासरकर सर याच्या चमूने सुंदर स्वागत गीत सादर केले. पुष्प गुच्छ देवून पाहुण्याचे स्वागत करण्यात येवून कार्यक्रमानंतर स्नेह भोजन घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ. ब्राम्हणकर तर आभार श्री. बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता अधिक्षक अधिक्षिका, ग्रंथपाल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share