समर्थ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले अग्निशामक दलाचे धडे

◼️आत्मसुरक्षा आणि आग विझविण्यासाठी विदयार्थी सज्ज, जे एम सी कंपनीचा उपक्रम

लाखनी : राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी आणि जे एम सी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अग्निशामक सुरक्षा सप्ताह १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत सुरक्षा दिन म्हणून मानला गेला.

हा सप्ताह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.जे एम सी सुरक्षा अधिकारी आलेखकुमार दास, बादल भगत, सागर मिश्रा, अक्षय गेडाम, गोविंदा निखाडे यांनी महाविद्यालयात येवून अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका आणि प्राध्यापकांनी यात प्रत्यक्षपणे सहभाग घेतला.

याप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ४२ ते ४५ डिग्री उन तापत असते अशा वेळी आग लागण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असतात, असे आपण प्रकर्षाने समाजात बघत असतो यामुळे कुठे आग लागली असेल तर आपण अग्निशामक दलाचे जवान येई पर्यंत आग आटोक्यात आणली पाहिजे एवढे प्रत्येकाला प्राथमिक ज्ञान असावे यासाठी आज ही कार्यशाळा घेतली.

यावेळी जे एम सी सुरक्षा अधिकारी आलेखकुमार दास यांनी विद्यार्थ्यांनी विविध सिलेंडरचे ज्ञान देत प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच जे एम सी सुरक्षा अधिकारी सागर मिश्रा यांनी प्रथमोपचार पेटी याबाबद विद्यार्थ्याना धडे दिले. सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे संयोजक प्रा धनंजय गिरहेपूंजे यांनी कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक कॅप्टन प्रा बा रामटेके यांनी केले तर आभार डॉ बंडू चौधरी यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share