दोन दिवसात दोघांची हत्या
भंडारा 14: शांतप्रिय असलेल्या भंडारा शहरात गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख सातत्याने वाढत आहे. दोन दिवसात दोघांची हत्या झाल्याने खळबळ माजली असून पोलिसांपुढे गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. डोळ्यात मिरचीपूड फेकून धारदार शस्त्राने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना शहरातील माकडे नगरमध्ये मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. मोनू विणू गेडाम (25) रा. आंबेडकर नगर तुमसर असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
काही दिवसापुर्वी मोनू गेडाम याने माकडे नगरात सलून व टॅटूचे दुकान लावले होते. घटनेच्या वेळी मोनू आपल्या दुकानासामोर बसला असता अचानक काही तरुणांनी तेथे पोहचून हाणामारीला Murder सुरूवात केली. यावेळी मोनूच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून धारदार शस्त्राने छातीवर व गळ्यावर वार Murder करण्यात आले. जीवाच्या आकांताने मोनूने तेथून पळ काढला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून पुन्हा वार केल्याने मोनूचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी संशयावरून चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून तपास पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दुसरी हत्येची घटना भंडारा तालुक्यातील मानेगाव/बाजार येथे घडली. येथे पाळीव जनावरे धुण्याचे पाणी अंगणात आल्याच्या वादात काठीने वार करून शेजाऱ्याची हत्या करण्यात आली. महादेव श्रीपत बोंदरे (56) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुबियांतील चंद्रशेखर विठोबा मते (50), विक्की चंद्रखेखर मते (24), मयूर चंद्रशेखर मते (19) व सरिता चंद्रशेखर मते (47) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
महोदव बोंदरे आणि चंद्रशेखर मते यांचे एकमेकांना लागून घर आहेत. काही वर्षापासून त्यांच्यात वाद सुरू होते. सोमवारी सायकांळी महादेव आपल्या घरासमोरील रस्त्यावर जनावरे धूत असताना ते पाणी चंद्रशेखरच्या घरात गेले. या कारणावरून रात्रीच्या सुमारास दोन्ही कुटूंबात वाद झाला. दरम्यान विक्की मते याने घरातून लाकडी काठी आणून महादेवच्या डोक्यावर मारली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महादेवचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलिस अधीक्षक वसंत जाधव, उपविभागीय अधिकारी संजय पाठील, पोलिस निरीक्षक, राजेशकुमार थोरात, बीट जमादार शंकर चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी आरोपींविरोधात भांदवी 302, 307, 323, 506, 34 कलमान्वय कारधा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.