मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

चंद्रपूर : आरोपी लोकसेवक श्रीमती वर्षा श्रीहरी मगरे (३७), पद वरिष्ठ लिपीक, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर यांनी ४ हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या पथकाने कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी या पदावर मत्स्यबिज केंद्र आसोलामेंढा येथे कार्यरत असुन त्यांचे मुख्यालय सावली तालुक्यात येते. सावली तालुका हा नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे तक्रारदार अनुज्ञेय वेतन श्रेणीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लागु करून मिळणे आवश्यक होते.परंतु ते त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांनी दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी सदरची बाब मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर यांचे निदर्शनास आणून दिली व त्यासंबंधाने कार्यालयीन पत्रव्यवहार सुध्दा केला. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत व वेतनच्या फरकाची रक्कम मिळणेबाबत तसेच केलेल्या पत्रव्यवहाराबाबत काय कार्यवाही झाली हे विचारपुस करणेकरीता मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी येथे जावुन संबंधीत काम करणारे वरिष्ठ लिपीक श्रीमती मगरे यांना सदर बाबत विचारणा केली असता श्रीमती मगरे यांनी सांगितले की, सदरच्या कामाकरीता तक्रारदार यांना ४हजार ५०० रु. द्यावे लागतील तेव्हाच श्रीमती मगरे हया तकारदाराच्या वेतन श्रेणी लागू करण्याचे आणि वेतनाचा फरक मिळवून देण्याचे काम करतील अशाप्रकारे आरोपी लोकसेवक श्रीमती मगरे यांनी तक्रारदार त्यांचे काम करून देण्याकरिता ४ हजार ५०० रु. लाचेची मागणी केली व पैसे न दिल्यास तुमचे काम होणार नाही असे सांगितले. तक्रारदार यांची सदर कामाकरीता लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लोकसेवक श्रीमती वर्षा मगरे यांचे विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील कार्यालयाशी दुरध्वणीद्वारे संपर्क साधून पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, चंद्रपूर यांचेशी संपर्क साधला आणि त्यांना सविस्तर बाब सांगितली. पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर अविनाश भामरे हे स्टाफसह मौजा ब्रम्हपुरी येथील पाटबंधारे विभागाचे रेस्ट हाउस येथे आले असता त्यांचेकडे लेखी तकार नोंदविली
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील पोलीस उप अधीक्षक भामरे यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे गोपनीयरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. आरोपी लोकसेवक श्रीमती वर्षा श्रीहरी मगरे, वय ३७ वर्ष, पद वरिष्ठ लिपीक, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, ब्रम्हपुरी यांनी तक्रारदार यांना वेतनश्रेणी लागु करणे आणि वेतनाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्याकरिता ४ हजार ५०० रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार रूपये मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, ब्रम्हपुरी येथे स्विकारल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नागपूर, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, नापोका रोशन चांदेकर, नापोका नरेश नन्नावरे, पोकाँ वैभव गाडगे, मपोकों मेघा मोहुर्ले व चालक पोकॉ विकास काशियावाले यांनी केली

Print Friendly, PDF & Email
Share