कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे देवरीवासी संतापले

वोल्टेजच्या लपंडावामुळे पंखे , कूलर , टीव्ही आदी उपकरणांचे नुकसान 

प्रा.डॉ. सुजित टेटे 

देवरी 05: देवरी शहरामध्ये विजेच्या दाबाची मोठी समस्या निर्माण झाली असून इलेक्ट्रिक उपकाराचे मोठे नुकसान होत असल्याने नागरिक संतापल्याचे वृत्त आहे.

वाढलेले बिल आणि आता कमी वोल्टेज ची समस्या लोकांना परवडणारी नसून जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. एकी कडे वीज वितरण कंपनी निवासी ग्राहकांच्या स्थिर आकारासह स्लॅबनुसार प्रतियुनिट वाढ केली आहे. वाढीव वीज दराची बिले वीज ग्राहकांना शॉक देणार आहेत. त्यामुळे उन्हासह वाढीव बिल घाम काढणार असल्याने ग्राहकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्याच बरोबर पंखे , कूलर व्यवस्थित चालत असून कमी वीज दाबामुळे उपकरणे मोठ्या प्रमाणात बिघडत असल्याचे लोकांच्या तक्रारी समोर येत आहेत.

विजेच्या कमी दाबाची समस्या तात्काळ सोडवावी आणि उन्हाच्या तडाख्यात कूलर पंख्यांना गती देऊन लोकांचा तापलेला माथा वीजवितरण कंपनीने प्रथम प्राधान्य देऊन सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

Share