वाघाच्या शिकार प्रकरणी वनविभागाकडून दोघांना अटक

भंडारा : वाघाची शिकार करून बावनथडीच्या वितरिकेत मृतदेह फेकूण दिल्याच्या कारणावरून तपासाअंती वनविभागाने दाेन जणांना अटक केली आहे. अटक केलेले बाप-लेक असून तुळशीराम दशरथ लिल्हारे व शशिकांत लिल्हारे अशी या आराेपींची नावे आहे. रविवारी तुमसर न्यायालयाने या बापलेकांना पाच दिवसांची वनकाेठडी ठाेठावली आहे.
बावनथडीच्या वितरिकेत ३१ मार्चच्या सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दाेन वयाेवर्ष असलेला वाघ मृतावस्थेत आढळला हाेता. वनविभागाने याप्रकरणी प्रारंभीला अन्य प्राण्यांसाेबत झालेल्या झुंजीत वाघाचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला हाेता. मात्र अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने या वाघाची शिकारच असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले हाेते.साकाेलीचे पशुधन विकास अधिकारी डाॅ. गुणवंत भडके यांनी तर चक्क ही वाघाची शिकार असल्याचे सुताेवाच केले हाेते. त्यांच्या अनुभवाचे बाेलही वनविभागाने गांभीर्याने घेतले नाही. प्रकरण दडपायचे की समाेर आणायचे याच विवंचनेत अधिकारी हाेते की काय असे वाटत हाेते. मात्र ‘लाेकमत’च्या वृत्ताने वनविभाग खळबडून जागा झाला. तपासाचे सूत्रे वेगवाणरीतीने फिरवित बपेरातील पाच जणांना चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, तुळशीराम व शशिकांत लिल्हारे या बापलेकांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. अटक केलेल्या बापलेकाला रविवारी तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांसमाेर हजर करण्यात आले. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नाेंदवित दाेघांनाही पाच दिवसांची वनकाेठडी ठाेठावली. तपासादरम्यान तुळशीराम लिल्हारे यांच्या शेतातून काही वन्यप्राण्यांची हाडे, कवटी, करंट लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खुंट्या व इतर साहित्य वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहे.
संपूर्ण घटनाचक्रात तपास अधिकारी एसीएफ साकेत शेंडे, नाकाडाेगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी मनाेज माेहिते, तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी गाेविंद लुचे, भरारी पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यासह अन्य कर्मचारी व पाेलीस विभागाने सहकार्य केले.
वनविभागाच्या तपासात आराेपीच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले हाेते. याशिवाय आराेपींनी विद्युत प्रवाहाचा वापर करुन वाघाची शिकार केली. आपल्यावर आड येवू नये म्हणून बैलबंडीच्या सहाय्याने वाघाचा मृतदेह बावनथडीच्या वितरिकेत नेवून फेकुण देण्यात आला. प्रत्यक्षरित्या वाघाची ही हत्याच असून जंगलातील अन्न साखळीतील एक महत्वाचा सर्वाेच्च घटक असून परिस्थितीकीय संतुलन राखण्यात वाघाचे माेठे याेगदान आहे. परिणामी ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असल्याचेही या निमित्ताने समाेर आले. वाघाची शिकार करणाऱ्या आराेपींना तीन ते सात वर्ष कारावास हाेवू शकताे, अशी शिक्षेचे प्रावधान आहे.

Print Friendly, PDF & Email
Share