कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंगाचे वाटप : चित्रा वाघ यांचेकडून सरकारविरुद्ध संताप व्यक्त

वृत्तसंस्था / बुलडाणा : कुटुंबनियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागाने दिलेल्या किट्समध्ये रबरी लिंग देण्यात आले आहे. त्यामुळे आशा सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे त्यावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकारावर सडकून टीका करत सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का असा संताप व्यक्त केला आहे.
तर, आरोग्य विभागाने मात्र या प्रकाराचे समर्थन केले आहे. आशा सेविकांना दिलेली किट्स जनजागृतीसाठीच आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचे किट्स दिल्याने लैंगिक आजार सुद्धा कमी होतील, असा दावाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.वैद्यकिय अधिकाऱ्यांनी या प्रकाराचे समर्थन केले असले तरी महिला वर्गातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत असल्याने आरोग्य विभागाला रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता अधिक बळावली आहे. राज्य सरकारकडून आशा सेविकांना दिलेल्या कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर नाराज असल्याचे चित्र ही पाहायला मिळत आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या या किट जनजागृतीसाठी दिल्या असल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. यामुळे लैंगिकते संबंधीत आजार सुद्धा कमी होतील अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.
महिलांच्या प्रश्नसंदर्भात नेहमीच एकजीव असणाऱ्या समाजसेविकांनी सुद्धा या किटवर आक्षेप घेतला आहे. आशा वर्करांना ही किट घेऊन गावागावात जाऊन जनजागृती करणे अवघड झाले आहे. कारण ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते. महिलांच्या घरी गेल्यावर लहान लहान मुले असतात. पुरूष मंडळी असतात. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी बोलणे अवघड असते, असे समाजसेविका डॉ. तबस्सुम हुसैन यांनी सांगितले.
हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचं डोके ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35 रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…थोडी लाज ठेवा…मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका…असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

Share