क्रीडा संकुलातील सोई-सुविधा अद्ययावत करा : जिल्हाधिकारी नयना गुंडे

गोंदिया: नागरिक व खेळाडूंसाठी क्रीडा संकुल अतिशय महत्त्वाचे असून गोंदिया शहरातील क्रीडा संकुल हे खेळाडू व नागरिकांसाठी हक्काचे ठिकाण आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्रीडा घडामोडी ठप्प होत्या. आता क्रीडा विषयक बाबी सुरू होणार आहेत. त्यामुळे संकुलातील सोई-सुविधा अद्ययावत करण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्ष नयना गुंडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज 10 मार्च रोजी जिल्हा क‘ीडा संकुल समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश लभाने, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसर, उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, जिल्हा क‘ीडा अधिकारी घनश्याम राठोड उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा क‘ीडा संकुलातील सुविधा व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संकुल बंद असल्यामुळे संकुलाची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संकुल स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी क‘ीडा विभागा सोबतच या ठिकाणी येणार्‍या खेळाडू व नागरिकांची असल्याचे गुंडे यांनी नमूद केले. स्वच्छतेसोबतच संकुलाच्या शुशोभीकरणाची आवश्यकता आहे असे सांगून क‘ीडा अधिकार्‍यांनी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. कोरोनामुळे जिल्हा क‘ीडा संकुलातील जलतरण तलाव बंद अवस्थेत होता. सदर तलावाची दुरुस्ती करून घेण्यात आली असल्याचे राठोड यांनी सांगितले. क‘ीडा संकुलातील सोई-सुविधांसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून या नियमावलीला येत्या 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. बैठकीत क‘ीडा संकुलाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Share