12 मार्चला राष्ट्रीय लोक अदालत

◾️प्रलंबीत प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची संधी
गोंदिया,दि.7 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया यांचेमार्फत जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यामार्फत सर्व तालुका न्यायालयामध्ये 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयात दाखल करण्यापूर्वीचे प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्ट कलम 138, बँक रिकव्हरीची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे- भाडे, बँक वसुली, प्राधिकरणाची कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत व पाणी बिलाची (चोरीची प्रकरणे सोडून) तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे.
तरी सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये तात्काळ निकाली काढून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.
00000

Print Friendly, PDF & Email
Share