विधानसभा क्षेत्रात सिंचन व्यवस्थेला जास्त प्रमाणात महत्व देण्याची गरज

आमदार सहषराम कोरोटे यांचे प्रतिपादन.
तिरखेड़ी(सालेकसा) येथे तालुका काँग्रेस कार्यकर्त्याचा मेळावा.

या मेळाव्यात अंदाज़े २५० इतर पक्षाच्या कार्यकर्त्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

सालेकसा,ता.०८: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या संगठन बळकटी सोबतच या मतदार संघात रोजगार हमीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु व्हावे या करिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना या क्षेत्रात लवकरात लवकर सर्व कामे सुरु करण्याचे निर्देश देण्यात येत आहे. या मतदार संघात सिंचन व्यवस्था वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ़ करण्यासाठी या विधानसभा क्षेत्रात सिंचन व्यवस्थेला जास्त प्रमाणात महत्व देण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
ते सालेकसा तालुक्यातील तिरखेड़ी येथे रविवार (ता.०६ डिसेम्बर) रोजी तालुका काँग्रेस तर्फे आयोजित तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप सह इतर पक्षाच्या २५० च्या जवड़पास कार्यकर्त्यांनी आमदार सहषराम कोरोटे यांच्या नेतृवात आणि त्यांच्या कार्यवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हा कार्यकर्ता मेळावा आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी सालेकसा पं.स.चे माजी सभापति यादवराव बनोटे, मध्यवर्ती बैंकेचे संचालक नामदेव कटरे, माजी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, माजी सभापती लताताई दोनोडे,माजी जि.प.सदस्य विजय टेकाम, रमन आत्राम, माजी पं.स.सदस्य हिरालाल फाफनवाड़े, डॉ.अजय उमाटे, सामाजिक कार्यकर्ता सीमाताई कोरोटे, गजानन कटरे, रामेश्वर कटरे, ओमप्रकाश लिल्हारे व जितु बल्हारे यांच्या सह सालेकसा तालुक्यातील सर्व आघाडीचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेड़ी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष प्रिया शरणागत, विमल बबलू कटरे, मनोज शरणागत यांच्या सह भाजप द विविध पक्षाचे दोनसे पन्नासच्या जवळपास कार्यकर्त्यांनी आमदार सहषराम कोरोटे यांचे नेतृत्व स्विकारून व कार्याशी प्राभावित होवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्याचा आमदार कोरोटे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे घालून व पुष्पगुच्छ भेट देवुन स्वागत केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक संजय देशमुख यांनी तर संचालन टेकचंद फुडे आणि मनोज गजभिये यांनी आणि उपस्थितांचे आभार सालेकसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वासुदेव चुटे यांनी मानले.
या मेळाव्याच्या आयोजनार्थ सालेकसा तालुका काँग्रेस चे अध्यक्ष वासुदेव चुटे, युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष नितेश शिवनकर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष लताताई दोनोडे, सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भारत लिल्हारे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज गजभिये, अनुसूचित जाती काँग्रेस आघाडीचे तालुकाध्यक्ष मिलिंद गजभिये व असंघटित कामगार काँग्रेस आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रमोद कोटांगले आदिंनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share