ब्लॉसम स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शनी 2022 चे आयोजन

◾️जागतिक विज्ञान दिनाच्या औचित्यावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

देवरी 28: विद्यार्थी जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन द्विगुणित व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे जागतिक विज्ञान दिनाच्या प्रसंगी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी प्राचार्य डॉ. सुजित टेटे ,संस्थचे सचिव निर्मल अग्रवाल , विज्ञान शिक्षक नामदेव अंबादे , हर्षदा चारमोडे , विश्वप्रित निकोडे , रुपाली उदापूरे , चंद्रकांत बागडे आदी शिक्षक उपस्थित होते.

विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन डॉ. सुजित टेटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यामध्ये इयत्ता 3 री ते 9वी चे 149 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित विज्ञान प्रमोग आणि मॉडेल्सचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक पंचासमोर केले.

भारतात जागतिक विज्ञान दिवस भौतिक शाश्त्रज्ञ तथा नोवेल पुरस्कार विजेते सी. व्ही. रमण यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. यावेळी विज्ञानाचे फायदे आणि नुकसान यावर विद्यार्थ्यांनी प्रकल्प बनविले आणि प्रदर्शनीत मांडले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तुलसी वंजारी आणि मनस्वी सोनुले यांनी केले असून आभार प्रदर्शन संस्कृती लांजेवार हिने मानले.

Print Friendly, PDF & Email
Share