गोंदिया: जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

गोंदिया 13: जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून Corona तिसर्‍या लाटेचा संभाव्य अंदाज खरा होताना दिसत असताना फेब्रुवारी महिन्याची सुरवात दिलासा देणारी ठरली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना बाधित असले तरी लवकरच ते कोरोनामुक्त होण्याची शक्यता दिसत आहे. आज, 13 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या 812 चाचण्यांमध्ये केवळ 14 बाधित आढळले असून, आज 87 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता 164 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. यात गोंदिया तालुक्यात 62, तिरोडा 1, गोरेगाव 12, आमगाव 12, सालेकसा 2, देवरी 7, सडक अर्जुनी 28 व अर्जुनी मोर तालुक्यातील 40 रुग्णांचा समावेश आहे.

Share