स्वर्ण सखींनी साजरी केली हळदी कुंकू सह उखाण्याची संध्या

◾️सोनार समाजाच्या समाज भवनात पार पडला साधा सोहळा, उखाण्याच्या स्वरूपात साजरा केला आनंदोजल्लोष

देवरी 27: तालुक्यातील संत श्री नरहरी सोनार समाज भवनात सोनार समाजाच्या स्वर्ण सखींनी अतिशय साध्या पद्धतीने हळदी कुंकवाच्या कार्यक्रम पार पडला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा समाजातील महिला एकत्रित येऊन सदर कार्यक्रमात सहभाग दर्शिविला.

नवीन वर्ष आणि मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हळद कुंकू या पारंपरिक संस्कृती सह उखाण्यांनी मज्जा यावेळी समाजातील सखींनी घेतली. उखाण्याच्या माध्यमातून एक विरंगुळा आणि आनंदोजल्लोष यावेळी सर्वांनी अनिभवला असून संस्कृती जपण्याचे संदेश यावेळी देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन कमला मस्के , सरिता कावळे , ममता रोकडे , अल्का दुबे , पायल येरपुडे , अर्चना येरपुडे आणि वैशाली टेटे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशासाठी समाजातील महिलांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share