देवरी: पोलीस सखींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

प्रा.डॉ.सुजित टेटे | प्रहार टाईम्स
देवरी 27: पोलीस उप मुख्यालयात नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या सायकांळी उत्प्रेक्षा बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने पोलीस सखींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 24 तास जनतेची सुरक्षेतीची कर्वत्व बजावत असतांना पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठी आणि सण उत्सव साजरा करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांचे कित्तेक सण कुटुंबाविनाच साजरे होत असतात. कधी निवडणूका , कधी कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये गुंतलेल्या पोलीस सखीचे आनंद द्विगुणित करण्यासाठी नवीन वर्ष आणि मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘हळदी कुंकू’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सदर कार्यक्रमाचे आयोजन सौ. प्रिया अशोक बनकर आणि सौ .भाग्यश्री रेवचंद सिंगनजुडे यांनी केला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. राचेलवार, उपाध्यक्ष सौ. पाटणकर आणि सौ. वांगळे हे होत्या. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात 100 रोपटे वाणाच्या स्वरूपात वाटण्यात आले असून पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश यावेळी देण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन नाईक महिला पोलीस चंद्रकला बांते यांनी केला असून आभार प्रदर्शन नाईक महिला पोलीस आशा मेश्राम यांनी मानला. कार्यक्रमाच्या यशासाठी निशा टेंभरे , सुनीता चौधरी , प्रिया शरणागत, प्रतिभा लेदे , ज्योती पंचभाई , योगिता उके , पुष्पा बिसेन आणि इतर महिला पोलिसांची महत्वाची भूमिका बजावली.

Print Friendly, PDF & Email
Share