◾️7 व्या आल इंडिया डांस स्पर्धेत सब जूनियर गटातून अव्वल
देवरी 27– तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक मध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेली प्रणश्री प्रमोद कलमकर हिने नुकतेच 7 व्या आल इंडिया डांस स्पर्धेत सब जूनियर गटातून अव्वल स्थान प्राप्त करून गोंदिया जिल्हाचे नाव रोशन केले आहे. सदर नृत्य स्पर्धा 23 जानेवारी 2022 ला खुशाल भवन गोंदिया येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुजा तिवारी , पुरुषोत्तम मोदी , कृतिका अग्रवाल , अविनाश बडगे , सुश्मिता बडगे, आयुष श्रीवास्तव आदि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 7 व्या आल इंडिया डांस स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये विविध वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रणाशी हिने आपल्या नृत्याने सर्वांचे लक्ष आपल्या कडे केन्द्रित करून आकर्षक असे नृत्य सादर केले होते. यामध्ये तिला प्रथम क्रमांक मिळाला असून स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून तिचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली.
प्रणाश्रीच्या यशासाठी शाळेच्या प्राचार्य डॉ. सुजित टेटे, शिक्षक , नृत्य शिक्षक , आई रोशनी कलमकर व वडील प्रमोद कलमकर यांनी अभिनंदन केले आहे.









