तिरंगा
घे तिरंगा हाती नभी लहरू
दे उंचच उंच जय हिंद,
जय भारत हा जयघोष
आज गर्जु दे आसमंत….
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा !
स्वप्न सगळेच बघतात,
स्वतःसाठी इतरांसाठी.
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत…
आपण आज एक स्वप्न बघूया
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा….
भारत मातेची आम्ही लेकरे
देशासाठी प्राण देऊ
देशाच्या प्रगतीसाठी
अहोरात्र आम्ही कष्ट करू……
कवि – सुदर्शन एम. लांडेकर
देवरी 9420191985