हिराटोल्यातील मुकुल बोपचे प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये झळकणार

गोंदिया: जिल्ह्यामधून एकमेव मुलगा वयाच्या 19 व्या वर्षी राजधानी दिल्ली ला होणाऱ्या 26 जानेवारी ला राजपथ मध्ये नेवी च्या तुकडित परेड मध्ये झळकनार.

भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. त्यातच भारतीय नौसेनेत रुजू व्हायची प्रचंड ईच्छा बाळगून आपलं ध्येय गाठण्यासाठी मुकुल हा अहोरात्र कठोर परिश्रम करून ऑगस्ट मध्ये आपला लक्ष पूर्ण करीत गोंदिया जिल्ह्याच्या माना उंचावल्या..

मुकुल देवेंद्र बोपचे रा.हिराटोला ता. गोरेगाव जि. गोंदिया यांची ऑगस्ट 2021 मध्ये नेवी मध्ये नियुक्ती झाली.विशेष म्हणजे मुकुल हा एका छोट्याश्या खेडेगावात वाढला आहे आणि त्याचे शिक्षण ही गवकडेच झालं आहे. एका छोट्याशा खेड्यातील मुलाने एवढा मोठा लक्ष गाठणे म्हणजे अभिमानास्पद चं आहे. मुकुल हा वायच्या नुकत्याच 19 व्या वर्षी भारतीय नौसेनेत रुजू झाला. प्रचंड इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमामुळे चं हे शक्य झाल्याचं मुकुल कबुली दिली आहे.

सेवेत रुजू झाल्यावर तब्बल 6 महिन्याची ट्रेनिंग पूर्ण करून मुकुल आता दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन राजपथावर परेट मध्ये झळकणार आहेत. मुकुल हा राजधानी दिल्ली ला पार पडणाऱ्या राजपथ वर चालणार गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पहिला व्यक्ती असणार आहे.त्यामुळे नक्कीच जिल्ह्याच्या माना उंचावणार आहेत.यामुळे मुकुल च्या परिवारात आणि मित्रपरिवारात अतिशय आनंदनाचा वातावरण निर्माण झाला आहे आणि त्याला Tv वर बघण्याची उत्सुकता वाढली आहे.

Share