लाखनी: एकट्यानेच घेतले 96 % मत; विरोधकांचा सुपडा साफ करणारा हा आहे तरी कोण? राज्यातील एकमेव उमेदवार

◾️राज्य गाजविणारा नगरसेवक 475 पैकी 457 मते एकट्याला

लाखनी 20: नगरपंचायत निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळवून उमेदवाराने राज्याचे लक्ष वेधले आहे. प्रदीप पुरुषोत्तम तितीरमारे असे विजयी उमेदवाराचे नाव आहे.

प्रदीप तितीरमारे वयाच्या १८ व्या वर्षांपासून समाजकारणात सक्रिय आहे. प्रभागातील सर्वसामान्य माणसाला अडचणीच्या काळात आधार देण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. रात्री-अपरात्री गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी प्रदीप कधीच मागे हटत नाही. त्याच्या याच स्वभावामुळे सर्वत्र लोकप्रिय आहे. कोरोना काळात गरिबांना रेशनचा पुरवठा असो की विजेचे थकलेले बिल भरण्याचे काम असो प्रदीपने कधीच पैशांचा विचार केला नाही.

शेती करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना प्रदीपने परिसरातील नागरिकांना कुटुंबाप्रमाणेच सांभाळले. म्हणूनच लोकांनी देखीत त्याला मतांचा आशीर्वाद देत कुटुंब प्रमुख म्हणून निवडून दिले. गरिबांचा लाडका प्रदीप वयाच्या ३४ व्या वर्षी नगरसेवक झाला, तोही राज्यातून सर्वाधिक मते मिळवून.

राज्यातील एकमेव उमेदवार:

९६.२१ टक्के मते घेऊन प्रदीपने एकतर्फी विजय मिळवला. मतदारांनी ४७५ पैकी ४५७ मतांचा दान एकट्या प्रदीपच्या पारड्यात टाकले. विरोधातील उमेदवारांना एकाला नऊ तर दुसऱ्याला केवळ पाच मते मिळाली. नगरपंचायत निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मते मिळवणारा प्रदीप राज्यातील एकमेव उमेदवार ठरला आहे.

इतर उमेदवारांचे सुपडा साफ व डिपॉझिट जप्त :

नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. नऊ मधून काँग्रेसच्या तिकिटावर प्रदीप निवडणूक रिंगणात उतरला. प्रदीप निवडणूक लढवणार असल्याचे समजतात कोणताही उमेदवार त्याच्याविरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत करत नव्हता. कशीबशी इतर दोघांनी हिंमत केली पण त्यांचे डिपाॅझिट जप्त झाले.

Share