पंचायत समिती देवरी येथे ‘घरकुल’चे बोगस लाभार्थी
लाभार्थी ग्रामविकास विभागाच्या शेजारच्या जिल्ह्यांत पंचायत समिती येथे कार्यरत
भुपेन्द्र मस्के/ प्रहार टाईम्स
देवरी ३: सर्वासाठी २०२२ पर्यंत घरे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांशी योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश ग्रामिण लोकांचे जिवनमान उंचावणे,आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गट लाभार्थीयांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यांचा तपशील व दस्तऐवज तपासून व खात्री करून पात्र लाभार्थीयांची अंतिम यादी तयार करण्यात येत असली तरिही दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना आणि शबरी घरकुल,रमाई आवास योजना सारख्या योजनांमध्येच खोटी कागदपत्रे सादर करून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेत असल्याची खात्रीशिर वृत्त प्रहार टाईम्स च्या हाती लागले आहे.
सविस्तर असे की, लाभार्थी हा ग्रामविकास विभागाशी निगडित असुन चक्क शेजारच्या जिल्ह्यांत पंचायत समिती येथे कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यांनी देवरी पंचायत समिती येथुन पंतप्रधान आवास योजनेच्या १ लक्ष ३० हजार निधीची उचल केल्याचे rhreporting.nic.in या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे उघड झाले आहे.
अधिक माहिती घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने गटविकास अधिकारी यांनी प.स भेट दिली असता गट विकास अधिकारी हे दालनात हजर नव्हते. त्यांच्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधले असता त्यांनी उत्तर दिले नाही.यावरून संपुर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकारांचा अवलंब करण्यात येत असल्याचे समजते.