राजकीय मुलाखत: भारतीय जनता पक्षाचे पं.स.चे उमेदवार धनराज कोरोंडे यांची मुलाखत
(डॉ.सुजित टेटे , संपादक, प्रहार टाईम्स)
गोंदिया जिल्ह्यात भागी/ शिरपूर येथिल विद्यमान सरपंच धनराज कोरोंडे. यांनी ग्रामविकासाचे वेगवेगळे प्रयोग करुन गाव स्वच्छ,व सुंदर बनविण्याचा प्रयत्न केला. असे असतांना त्यांना निवडणुकीसाठी लोक स्वतःहून पाठिंबा देत आहेत व त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. यात युवकांचे व महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. आता त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर देवरी तालुक्यातील चिचगड प.स. मतदारसंघातील युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक पुढाकार घेऊन त्याच्या विजयाकरिता प्रयत्न करीत आहेत. ‘‘लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मी वचनबद्ध आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा, यासाठी माझी उमेदवारी आहे.असे ते म्हणतात.
प्रश्न 1- आपल्याबद्दल थोडक्यात सांगा?
- मी धनराज पंढरी कोरोंडे येणा-या दि 21/12/2021 च्या सार्वत्रिक पंचायत समिती निवडणुक 2021 करिता मी भारतीय जनता पक्षातुन कमळ या निवडणुक या चिन्हावर निवडणुक लढवित आहे. माझं शिक्षण कृषी पदविका असुन मी व्यवसायाने शेतकरी असुन सद्यस्थितीत सरपंच म्हणून गटग्रामपंचायत भागी/ शिरपूर येथे कार्यरत आहे.
प्रश्न 2-आपले समाजाच्या विकासातील आजपर्यंतचे योगदान काय? निवडणूक लढताय म्हणून हा प्रश्र्न केला
-म्हणजे आजपर्यंत मी काय केले असेच ना…!
भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे स्वत च्या तसेच गावातील इतरांच्या शेतीवर नाविन्यपुर्ण पिक प्रयोगातुन शेतक-यांचे जिवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केलेत
• मागील 4 वर्षापासुन गट ग्रामपंचायत भागी येथे सरपंच पदावर कार्यरत असतांनी स्मार्ट ग्राम योजना 2017-18 चे जिल्हातुन प्रथम पारीतोषिक, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हातुन प्रथम पारितोषिक मिळवले
अनेक योजना व उपक्रम राबविले
जसे दुध डेअरी व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र, नागरिकांना पिण्यासाठी ऑरोचे थंड पाणी , पाणी बचतीकरिता वाटर मिटर बसविले. घर तेथे शौष खड्डा बांधला. मनरेगाच्या माध्यमातुन सिमेंट कांक्रेट चे मजबुत रस्ते व नाली बांधकाम,बचत गटांना व्यवसायिक मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या. माती परिक्षण व शेती शाळेच्या माध्यमातुन शेतक-याची शेती उन्नत करण्यास प्रयत्न केले. दोन्ही गावात कबड्डी स्पर्धा विविध महापरूषांच्या जयंत्या पुन्यतिथ्या साजरा करण्यास सुरूवात केले. वनराई बांधा-यांचे बांधकाम शाळा व अंगणवाडी डिजीटल करून सौदर्यीकरण केले. बिरसा मुंडा स्मारक बांधकामास हातभार गावामध्ये नविन समाज भवन, मुत्रीघरे ,चावळी बांधकाम इत्यादी समाजोपयोगी करून एका आदर्श गावाची निर्मीती करण्याचे प्रयत्न केले व करत आहे.
अल्पावधितच गावापुरता विकासाचा प्रयत्न करता आला. हे सर्व प्रयत्न गावाकरिता झाले. आपले चिचगड पंचायत समिती क्षेत्रात अजुन व्यापक दृष्टीकोण राबविणेच्या माझे प्रयत्न असतील.
प्रश्र्न: आपण निवडणुकीत जिकंल्यास आपण काय करणार याची थोडक्यात माहिती सांगा?
-प्रत्येक गावाच्या शाश्वत विकासासाठी गाव विकास आराखडा गावातील लोकांच्या सहकार्याने तयार करून गावांचा सर्वागिन विकास करणे हा माझा पहिला काम असेल
क्षेत्रातील प्रत्येक गावात उच्च प्रतीचे कांक्रेटीकरण तसेच फुटपाथ बांधकाम, मनरेगा व विविध योजनांची सांगड घालुन कामे करणार.
पिण्यासाठी शुद्ध पाणी “हर घर नल” या योजनेतुन आणण्याचे प्रयत्न.
गावातील पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी नाली बांधकाम घनकचरा व्यवस्थापन शोषखड्डे या योजनेची अंमलबजावनी करणार
मनरेगाच्या माध्यमातुन प्रत्येक हाताला 100 दिवस काम देण्याचे वचन देतो
वैयक्तीक तसेच सार्वजनिक लाभाच्या विविध योजनेचे क्षेत्रातील जनतेला लाभ मिळवुन देणार जसे घरकुल योजना, बिरसा मुंडा विहीर योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहिर योजना, वृद्ध अपंग निराधार पेन्सन योजना इ.
सार्वजनिक शाळा व इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविणार
गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याकरिता शालेय साहित्य व रिक्त शिक्षकांची पुर्तता करणार विद्यार्थ्यासाठी क्रिडा महोत्सव सांस्कृतीक महोत्सव प्रत्येक वर्षी राबविणार.
आदिवासी प्रकल्प कार्यालय पंचायत समिती जिल्हा परीषद समाज कल्यान यांच्या विविध योजनांची माहीती पुरवुन लाभार्थ्याना लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार.
नागरिकांना बसण्यासाठी ओटे, महिलांना कपडे धुण्याकरिता ओटे, गावातील तलावाचे सौदर्याकरण, वाचणालये, व्यायामशाळा इत्यादी दैनंदिन गरजा पुर्ण करण्यावर भर देणार
शेती शाळा पशुसंवर्धन मेळावे, पशु रोगनिदान शिबिर मोफत चष्मा वितरण शिबिर दुग्ध उत्पादन वाढीस चालना इत्यादी उपक्रम राबविणार
कोरोना सारख्या आपातकालीन परिस्थितीत मोफत मास्क, मच्छरदाणी औषधी व रसायनाचे वितरण करणार.
सामान्य नागरिकांच्या अपेक्षांची पुर्तता करण्याचा प्रयत्न असेल. तरी येणा-या 21 तारखेला माझ्या क्षेत्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचे अधिकृत निवडणुक चिन्ह कमळ या चिन्हावर बटन दाबुन मला प्रचंड बहुमताने विजयी कराल. हे जनतेला आवाहन करतो
धन्यवाद…!
(संवादक- डॉ.सुजित टेटे)