पदवीधर निवडणूकीत 25 मतदान केंद्रांवर 16934 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
गोंदिया,दि.28(जिमाका) नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील 16934 पदवीधर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात एकूण 25 मतदान केंद्र असून याठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे. या निवडणूकीची प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणी 3 डिसेंबर 2020 रोजी नागपूर येथे होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण 25 मतदान केंद्र असून त्यापैकी 8 मतदान केंद्र Auxillary आहेत. 25 मतदान केंद्रापैकी 23 मतदान केंद्र ही संबंधित तहसिल कार्यालयात असून फक्त 164-दवनीवाडा (ता.गोंदिया) व 172-नवेगावबांध (ता.अर्जुनी/मोर) ही दोन मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळांमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील 8 तहसिलदारांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरीता मतदान केंद्रासाठी एकूण 34 मतदान केंद्राध्यक्ष तसेच 102 मतदान अधिकारी यांची प्रत्येक मतदान केंद्रावर (1+3) यानुसार नियुक्ती करण्यात आली असून संबंधित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने देखरेख करण्यासाठी आठही तालुक्यात 8 फिरते पथक गठीत करण्यात आले असून प्रत्येक पथकात 1 नियंत्रण अधिकारी व पोलीस विभागातील अधिकारी यांचेसह 3 कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण 25 मतदान केंद्र असून त्यामध्ये तालुकानिहाय मतदान केंद्र, मतदान केंद्र क्रमांकाचे नाव व मतदार (पुरुष व स्त्री) यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.