गडचिरोली : मिलिंद तेलतुंबडे एन्काऊंटरचा बदला घेणार; नक्षलवाद्यांकडून सहा राज्यांत बंदचे आवाहन
प्रतिनिधी / गडचिरोली : गेल्या आठवड्यात गडचिरोली येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आता या घटनेवर नक्षलवाद्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नक्षलवाद्यांनी मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख ‘जनयोद्धा’ असं करत त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचं पत्रक जारी केलं आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून सहा राज्यात बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी एक परिपत्रक जारी केलं असून त्यामध्ये टॉप नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे याचा उल्लेख ‘जनयोद्धा’ असं करण्यात आला आहे. गडचिरोलीत झालेल्या नक्षलवाद्यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकीही देण्यात आली आहे. तसेच २७ नोव्हेम्बरला सहा राज्यांत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.