काळ्या फिती लावून तलाठ्यांची तहसीलकार्यालयासमोर निदर्शने
देवरी 26 : विदर्भ पटवारी संघ नागपूर, गोंदिया शाखेच्यावतीने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली असून यामध्ये देवरी तालुक्यातील तलाठ्यानी दिला. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून ८ नोव्हेंबरपूर्वी शासनाने तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास ८ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा तलाठी संघटनेने यावेळी दिला.
मागील वर्षी तलाठ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन असहकार आंदोलन सुरू केले होते. तेव्हा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यस्थी करून हे आंदोलन मागे घेण्यास सांगितले व त्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले होते. मात्र, यानंतरही शासनाने तलाठ्यांच्या मागण्यांची पूर्तता केली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सोमवारपासून काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरूवात करण्यात आले.२९ ऑक्टोबरला जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास ८ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे. संघटनेच्यावतीने विविध तलाठ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या प्रसंगी देवरी उपविभाग तलाठी संघटना उपाध्यक्ष सी.डी तुमसरे, सदस्य एन एस वरखडे, एम एस मेंढे, पी.आर गजबे,विजय बांते, विकास मुंढरे, सचिन तितरे,विपुल लाडे, पल्लवी घायवट, अस्मिता पेंदाम, आरती मेश्राम, पल्लवी मेश्राम , वर्षा मरस्कोल्हे , मोहसिना पठाण, शीतल मांदाडे, पी एस चव्हाण व एल एस कापगते व तलाठी संघटना देवरी चे सदस्य सहभागी होते.