नितीन गडकरींच्या सहकार्याने देवरीला मिळाली अम्बुलस

दुर्गम भागातील नागरिकांना होणार मदत

देवरी 26 सेवा है यज्ञ कुंडच्या धरतीवर सामाजिक सेवेचे तथा नि: स्वार्थ सवेचे महान पुजारी कै. लक्ष्मणराव मानकर गुरुजी ट्रस्ट नागपुरच्या माध्यमातून आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने देवरी तालुक्यातील नागरिकांसाठी अत्याधुनिक सर्वच सोयी सुविधानी उपलब्ध असलेली सुसज्ज अंबुलन्स कार सेवा सर्वच नागरिकांच्या तथा रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

देवरी तालुका हा तसा अतिदूर्गम भाग असून राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे. त्यामुळे, या भागात अपघातांचे प्रमाण सुध्दा जास्त आहेत. तसेच अतिदूर्गम भागामुळे गरजू रुग्णांना कोणत्याही आजारपणात ऐनवेळी खुप मोठा आर्थिक फटका बसत असतो. अनेकदा अम्बुलस कमी आणि रुग्णसंख्या जास्त अशावेळी मग खाजगी भाड्याच्या गाडी शिवाय पर्याय नसतो. आणि हाच फटका कधीकधी रुग्णांच्या जीवनासाठी धोका ठरत असतो.
या सर्व बिंदूचा विचार करुन भाजपचे भंडारा- गोंदिया संघटक वीरेंद्र अंजनकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समक्ष समस्या मांडल्यामुळे नितीन गडकरी यांनी सामाजिक सेवेचे पुजारी कै. लक्ष्मणराव मानकर गुरुजी ट्रस्ट मार्फत देवरी तालुक्यासाठी न नफा आणि न तोटा तत्त्वावर अत्यावश्यक अत्याधुनिक सर्वच सोयी सुविधांनी सुसज्ज अशा अम्बुलसची सुविधा सर्वच रुग्णांच्या सेवेसाठी २३ ऑक्टोबर शनिवारला येथील प्रसिद्ध देवस्थान माँ धुकेश्वरी मंदिरात स्वागत तथा पूजाअर्चना करुन रुग्णांच्या सेवेसाठी देवरी तालुक्यात सुरु करण्यात आली.

यावेळी भंडारा- गोंदिया संघटक वीरेंद्र अंजनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, सचिव यादवराव पंचमवार, ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, महामंत्री प्रवीण दहीकर, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष राजू शाहू, युवा तालुकाध्यक्ष छोटू भाटीया, ज्येष्ठ कार्यकर्ते बट्टी भाटीया, सुशील जैन, रितेश अग्रवाल, रिशी भाटीया, किशोर येनप्रेडीवार, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष दीपक शाहू, महामंत्री देवेंद्र गायधने, कोषाध्यक्ष राहुल मडावी आदी मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share