1 ली ते 4थी चे वर्ग सुरु होणार..! राज्यात शिक्षण क्षेत्रात किलबिल सुरू;
मुंबई २३: राज्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतची शाळा सुरू झाल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्या संदर्भात किलबिल सुरू झाली.त्यासाठी शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठकीत चर्चा केली आहे.
राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत.राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होत आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता 8 ते12चे वर्ग सुरु झाले असून कोरोनाचे नियम पाळत महाविद्यालयांनाही परवानगी देण्यात आली आहे.
आता राज्यात सरसकट पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली जोमाने सुरु झाल्या आहेत.
राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. याबाबत वर्षा गायकवाड लवकरच मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्सबरोबरही चर्चा करणार आहेत.
काल वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सुरू असलेल्या शाळांबाबतचा आढावा घेतला. राज्यात शाळा सुरू होऊन3 आठवडे झाले आहेत.या तीन आठवड्याचा अनुभव लक्षात घेता राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू कराव्यात अशी भूमिका राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडली.सध्या राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत.त्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडणार आणि टास्क फोर्सशी चर्चा करणार असून त्यानंतर राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आता संपूर्ण सत्रात शैक्षणिक किलबिल सुरू होईल.