महाराष्ट्र बंदला ‘या’ संघटनांचा असणार सक्रिय पाठिंबा

मुंबई 11: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांच्या चिरडण्यात आलं होतं. त्याच घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महारष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद राहील असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं. अशातच शेतकऱ्यासांठी असलेल्या या महाराष्ट्र बंदला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमी आंदोलन पुकारणाऱ्या किसान सभेने महाराष्ट्र बंदला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. या महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनंही सहमती दर्शवली आहे. वेगवेगळ्या पक्षांनी आणि संघटनांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करत पाठिंबा दर्शवला आहे.

महाराष्ट्रातील पुणे व्यापारी महासंघानंही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांनी लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून बंदला पाठिंबा दर्शवला आहे. याशिवाय नागपूर व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्यानं चिरडून मारले. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Share