शेतकऱ्यांना पाण्यात जाऊन फोटो काढायला लावल्यास होणार कारवाई
पुणे: राज्यामध्ये अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी उभ्या पिकासह माती देखील खरवडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पाणी असणाऱ्या पिकामध्ये उभे राहून फोटो काढण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना याबद्दल विचारले असता, अशाप्रकारे शासनाकडून कधीही सांगण्यात येत नाही, परंतु कोणी असे फोटो काढण्यास सांगत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
नुकसानीची आकडेवारी पूढे आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल, ओला दुष्काळाची मागणी केली जातेय.
नुकसानीचे स्वरूप पुढे आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्या संदर्भात देखील निर्णय घेतला जाईल)
ई पीक पाहणी संदर्भांत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर बोलताना थोरात म्हणाले की, ही एक नवीन युगाची सुरुवात आहे. यामुळे प्रत्यक्ष माहिती तंतोतंत कळणार आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना थोड्याश्या अडचणी येतील मात्र पुढे सुलभता येणार आहे.