
डिजिटल 7/12 वर वर्ष 2020-21 चा खसरा चढवून तालुक्यातील शेतकर्यांना त्वरित द्यावा देवरी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी
देवरी 23- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आदिवासी महामंडळाकडून धान्या खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत परंतु धान्य खरेदी केंद्रावर शेतकर्यांना ऑनलाइन डिजिटल सातबारा ची मागणी करण्यात येत असून त्यावर 2020-2021चा खसरा चढविलेला मागत आहे.
परंतु सध्याची परिस्थिति बघता तहसील कार्यालयाकडून शेतकर्यांना डिजिटल सातबारा वर 2020-2021 च खसरा चढविलेला नसल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना धान्य खरेदी केंद्रावर धान्य विकता येत नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांची गैरसोय होत आहे .
या संदर्भात देवरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी द्वारे तहसीलदार देवरी यांना निवेदन देण्यात आले असून यावर तात्काळ उपाययोजना करून शेतकर्यांची समस्या दूर करण्याचे निवेदन येणात आले. यावेळी छोटेलाल बिसेन (तालुकाध्यक्ष ), रमेश ताराम , दिलीप दुरुगकार , दिपेश टेंभरे , भैय्यालाल चांदेवार , सर्वांनंद कवास , सुजीतकुमार अग्रवाल , भाष्कर धारमशहारे, दिलीप कुंभरे ,राजू लांडेकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.








