अखेर 8 महिन्यांनंतर शाळेची घंटा वाजली
मार्गदर्शक सूचना ,अटी व शर्तीचे पालन करून देवरी तालुक्यात 9 वी ते 12 चे वर्ग सुरू
कुठे उत्साह तर कुठे चिंता मात्र विद्यार्थी उत्साही
देवरी 23 – राज्यात 13 मार्च 2020 पासून साथरोग अधिनियम सुरू झालेले असून कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. मिशन बेगीन अगेननुसार शासनाकडून शालेय शिक्षण पुन्हा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाच्या काटेकोरपणे अमलबजावणी करून गोंदिया जिल्हातील देवरी तालुक्यातील 9 वी ते 12 वी चे वर्ग असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था , अनुदानित शाळा , विना अनुदानित शाळा , कायम विना अनुदानित अशा 32 शाळा शिक्षण विभागाच्या माहितीनुसार सुरू झालेल्या असून यामध्ये एकूण 239 शिक्षक व 107 शिक्षकेतर कर्मचारी सज्ज झालेले आहेत. 29 शाळा निर्जंतुक करण्यात आलेले असून 28 शाळेत थर्मल स्कनर , ओक्सीमिटर इत्यादि वस्तु उपलब्ध आहेत . 26 शाळेमध्ये शाळा समितीची सभा घेतली असून 29 शाळा आज (23 ) ला सुरू करण्यात आल्या असून 4854 पैकी 787 विद्यार्थी पहिल्या दिवसी उपस्थित होते . 1511 पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची संमती दिलेली असून आज एकूण 271 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
त्या पैकी 19, 20 आणि 23 तारखेच्या कोविड चाचणी अहवालनुसार 200 शिक्षकांची व 49 कर्मचार्यांची आरटीपीसीआर कोविड चाचणी झालेली असून 11 शिक्षकाचे नमुने पोसीटीव्ह आलेले आहे. त्या शिक्षकांना शाळेत न येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
एकंदरीत 8 महिन्या नंतर शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी उत्साही बघावयास मिळाले असून विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी , मार्गदर्शक सूचनाचे पालन , शाळा करीत असल्याचे शिक्षण विभागाद्वारे सांगण्यात आले.