लायन्स क्लबच्या आरोग्य शिबीरात 650 लोकांनी घेतला लाभ

देवरी 24:(प्रा. डॉ. सुजित टेटे) नक्षलग्रस्त आणि आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यात आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य विषयक आरोग्य विषयक समस्या बघावयास मिळतात. यावर उपाय म्हणून लायन्स क्लब च्या वतीने आज निशुल्क रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये 650 लाभार्थ्यांनी आरोग्य विषयक चिकित्सकांकडून उपचार करून घेतल्याची माहिती क्लब च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

तालुक्यातील लोकांना उपचारासाठी गोंदिया नागपूर या ठिकाणी जावे लागले त्यामुळे मोठा खर्च आणि वेळ सुद्धा वाया जात असते. यावर उपाय म्हणून लायन क्लब देवरी आणि सहयोग हॉस्पिटल च्या संयुक्त विद्यमाने देवरी येथे आफताब मंगल कार्यालयात दुपारी 11 ते 4 या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिराचे आयोजन पारस कटकवार, आफताब शेख , हमीद मेमन, पिंकी कटकवार , ज्योती रामटेककर , मनोज मेश्राम , अनिल मेश्राम , सुद्धा अग्रवाल , पुस्पा धुर्वे , हेमचंद रामटेककर, सुमन बिसेन यांनी केले असून या निशुल्क आरोग्य शिबिरामध्ये डॉ.अशलेष तिवारी , डॉ. मयूर चौरे , डॉ .मुनेश्वर सूर्यवंशी, डॉ आदित्य महाजन , डॉ अनुप अग्रवाल ,डॉ प्रदीप जुडा ,डॉ सुमित पिसे , डॉ मणिंदर जांभुळकर , डॉ केवल धोने आदी उपस्थित होते .

Share