पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिला राजीनामा
चंदिगढ : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जात त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कल्पना दिली असल्याची माहितीही अमरिंदर सिंह यांनी दिली.
राजीनामा देतांना अमरिंदर सिंह यांनी म्हटले की, ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्री बनवावे. सरकार चालवण्यासंदर्भात माझ्यावर संशय निर्माण करण्यात आला आहे. माझा अपमान करण्यात आला. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. सकाळी मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली होती. मला सर्व रस्ते खुले आहेत. सर्व पर्यायांवर विचार केला जाईल. समर्थकांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल असे, अमरिंदर सिंह यांनी म्हटले.
राजीनामा देण्यापूर्वी अमरिंदर सिंह यांनी आपल्या बाजूने असलेल्या आमदारांसोबत बैठक घेतली. चंढिगड येथील त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यानंतर अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांकडे आपल्या राजीनामा सुपूर्द केला.